10वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी खुशखबर असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत जळगाव येथे भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. MahaTransco Recruitment 2023
इच्छुक उमेदवार 14 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. या भरतीद्वारे एकूण 37 रिक्त आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
या पदासाठी भरती?
ही भरती ”वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)’‘ या पदासाठी होणार आहे.
आवश्यक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) असावा तसेच
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे अत्यावश्यक आहे.
वयोमर्यादा : 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत असावे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट मिळेल.
शुल्क : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी कुठलेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2023
अधिसूचना पहा : PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा