नवी दिल्ली । देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मॉरिशसला 14 हजार टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
देशांतर्गत गरजा आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जुलै 2023 मध्ये केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर आता केंद्र सरकारनं बिगर बासमची तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे.भारतातून मॉरिशसला आता 14 हजार टन बिगर बासमती तांदळाची निर्यात होणार आहे.दरम्यान, तांदळाची निर्यात ही नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड कडे देण्यात आली आहे.
तब्बल 10 महिन्यानंतर केंद्र सरकारनं बिगर बासमची तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. जुलै 2023 मध्ये सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी अखेर उटवली आहे. भारतातून मॉरिशसला आता 14 हजार टन बिगर बासमती तांदळाची निर्यात होणार आहे. देशांतर्गत गरजा आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
दरम्यान, मॉरिशसबरोबर इतरही अनेक देशांना तांदळाची निर्यात केली जाणार आहे. यामध्ये नेपाळ, कॅमेरून, कोटे डी आयव्होर, रिपब्लिक ऑफ गिनी, मलेशिया, फिलीपिन्स, सेशेल्स, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, कोमोरोस, मादागास्कर, इक्वेटोरियल गिनी, इजिप्त या देशांमध्ये देखील तांदळाची निर्यात केली जाणार आहे.