मुंबई – राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुलडणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार धावले आहे.पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने १० हजारांची मदत करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी मोठी शेतकऱ्यांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. १९ ते २३ जुलै या कालावधीत यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात पीक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.
दरम्यान नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आता पाच हजार ऐवजी १० हजार रुपये मदत देण्यात येईल अशी घोषणा अजित पवार यांनी सभागृहात केली. यासह दुकानांचं नुकसान झाल्यास ५० हजारांची मदत तर पुरात मृत्यूमुख पडलेल्या नातेवाईकाना ४ लाखांची मदत, करण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.