मामे सासऱ्याच्या मारेकरी जावयास पाच दिवसांची पोलीस कस्टडी

---Advertisement---

 

भुसावळ : शहरात जावयाने मामावर चाकू हल्ला करुन ठार मारले. ही घटना काल शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. आयन कॉलनी परिसरात हा खून करण्यात आला होता. यात समद इस्माईल कुरेशी (वय ३५) या तरुणाचा खून तर एक जण जखमी झाला आहे. या हल्ल्यातील मारेकरी सुभान शेख यास न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.


शहरातील आयान कॉलनी भागातील रहिवाशी सुभान शेख व त्यांची पत्नी यांच्यामध्ये दुपारी कौटुंबिक वाद उफाळून आले. या वादात नंतर शेख यांची पत्नी दुपारी ही जळगाव येथील मामाकडे गेली. वडील व मामा हे जावाईच्या घरी समजूत काढण्यासाठी आले असता जावायाने मामा समद शेख इस्माईल कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला चढविला यात घटनेत मामाचा मृत्यू झाला आहे. तर वडिल शेख जमिल शेख शकुर यांना मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.

पोलिसांनी संशयित सुभान शेख यास ताब्यात घेतले. . शुभान शेख हा चार वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाला होता. त्याचे पत्नीसोबत नेहमी भांडण होत असे. घरात वाद झाल्यास तीच्या मामाकडे कंडारी येथे निघून जात होती. व परत यायची. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी दुपारी दोघे पती पत्नीमध्ये पुन्हा कौटुंबिक कलह झाला. यानंतर ती मामाकडे निघून गेली.

---Advertisement---

 

जावाई यांची समजूत काढण्यासाठी मुलीचे मामा व वडील हे भुसावळला आले. मात्र, जावाई याने सासरे शेख जमिल शेख शकुर यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. तर मामा समद शेख इस्माईल यांना चाकूने छातीवर वार करीत जखमी केले. त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमध्ये पोलिसांनी संशयित सुभान शेख यास ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---