10वी,12वी उत्तीर्णांना ‘तटरक्षक दलात’ नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी!

तरुण भारत लाईव्ह ।०७ फेब्रुवारी २०२३।  तुम्ही जर 10वी, 12वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. भारतीय तटरक्षक दलात बंपर भरती निघाली आहे. त्यानुसार अर्ज प्रक्रिया 06 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाली असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर तुमचा अर्ज सबमिट करा.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) नाविक (जनरल ड्युटी-GD) – 225 पदे
शैक्षणिक पात्रता :
 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 30 पदे
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण

वयाची अट: जन्म 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 300/- [SC/ST: फी नाही]

निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या निवडीसाठी चार टप्प्यांची परीक्षा घेतली जाईल. ज्याच्या आधारे अखिल भारतीय दर्जाची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. याशिवाय, भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी अधिसूचना वाचावी