10th Result : जळगावचा निकाल ९३.५२ टक्के, कोण आघाडीवर मुलं की मुली?

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी, घोषित करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचा निकाल ९३.५२ टक्के लागला आहे.

जळगाव जिल्ह्यातून ५६,२३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५,९२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून उत्तीर्ण परीक्षार्थी ५२,३०७ असून, त्यांची टक्केवारी ९३.५२ एवढी आहे. निकालात विशेष प्राविण्य मिळविणारे २१,१७६ विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीमध्ये १९,८३७, द्वितीय ९,७३१ आणि उत्तीर्ण श्रेणीत १,५६३ विद्यार्थी आहेत.

याही निकालात मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.५९ टक्के तर मुलांचे ९१.८९ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात २.२ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालाची आकडेवारी सन २०२२ मध्ये ९५.७२ टक्के होती, तर आता ९३.५२ टक्के आहे.