तुम्हीही बारावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे एकूण 1526 जागा भरल्या जाणार आहे.जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील ते अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 पर्यंत आहे.
या पदांसाठी होणार भरती?
1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 243
2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) 1283
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी :
उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिकांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे. सूट मिळालेल्या उमेदवारांसह सर्व उमेदवारांना लागू सेवा शुल्क भरावे लागेल.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा