---Advertisement---

मोठी बातमी ! पाकिस्तानातील ६ शहरांमध्ये १२ ड्रोन हल्ले, साखळी स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

---Advertisement---

Chain blasts in Pakistan: भारतीय सैन्याने पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर ६-७ मे च्या रात्री हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात नऊ दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत ही कारवाई केली आहे. 

दरम्यान,ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेला हल्ला ताजा असतांनाच पाकिस्तानात साखळी बॉम्बस्फोटान झाल्याची माहिती समोर आली आहे.पाकिस्तानच्या ६ शहरामध्ये १२ ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या सकाळी बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पाकिस्तानी माध्यमांनुसार, कराचीमध्ये ड्रोन हल्ले झाले आहे. ड्रोन स्फोटानंतर संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. लष्कराने परिसराचा ताबा घेतला आहे. स्फोटामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आतापर्यंत ६ शहरांमध्ये ड्रोन हल्ले

पाकिस्तानमधील कराची,लाहोर, चकवाल, गुजरानवाला आणि घोटकी येथे ड्रोन हल्ले झाले आहेत. ड्रोन हल्ल्यामुळे या भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. हे ड्रोन कुठून आले याबद्दल पाकिस्तानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण १२ स्फोट झाले आहेत. लाहोरमधील लष्करी तळाजवळ ड्रोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment