Waghur Dam : वाघुर धरणाचे 20 दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

---Advertisement---

 

Waghur Dam : भुसावळ, प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. उपविभाग जामनेर अंर्तगत असलेल्या वाघूर मोठा प्रकल्प आज सकाळी 6.00 वाजता 97.0 % पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे वाघुर नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असून, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उपविभाग जामनेर अंर्तगत असलेल्या वाघूर मोठा प्रकल्प आज सकाळी 6.00 वाजता 97.0 % पाणीसाठा झालेला आहे. वाघुर प्रकल्पाच्या द्वार परिचलन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगांव यांच्या आदेशान्वये वाघुर प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता वाघुर प्रकल्पाचे आज सकाळी 8.00 वाजता द्वार परिचलन करुन वाघुर नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

सध्यास्थितीत वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून येवा वाघुर धरणात येत आहे. वाघुर प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी पशुधन, चीज वस्तू, शेती मोटार पंप, गुरेढोरे सुरक्षितेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---