मुक्ताईनगर : अभाविप व विद्यापीठ विकास मंच यांच्या प्रयत्नाने येथील TYBA च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. एका विषयाचा पेपर देऊनही सदर विद्यार्थ्यांना अबसेन्ट दाखवण्यात आले होते. यासाठी अभाविपने प्रश्न लावून धरला होता, अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात TYBA सत्र ५. या वर्षाचा (PUB 351 introduction of public ambition) या विषयाचा पेपर देऊन ही १४ विद्यार्थ्यांना निकालामध्ये अबसेन्ड दाखवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मुक्ताईनगर येथील कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनिर्वाचित सिनेट सदस्य दिनेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती.
दिनेश चव्हाण यांनी सदर बाब महाविद्यालय व विद्यापीठ प्रशासनाला निदर्शनास आणून दिली. अखेर विद्यापीठ प्रशासनाकडून पुन्हा १८ रोजी नव्याने निकाल लावण्यात आला आहे. यामध्ये १२ विद्यार्थी पास झाले असून दोन विद्यार्थी नापास झाले आहेत. यासाठी अभाविपचे शहरमंत्री रुपेश कोळी, विश्वजीत देशमुख, तालुका सह-संयोजक सौरभ पाटिल यांनी देखील प्रयत्न केले.