---Advertisement---

12th exam : १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा

---Advertisement---

12th exam :  उद्या २१ फेब्रुवारी पासून  १२ वीची परीक्षा सुरू होत  आहे. परीक्षेसाठी एकुण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यात विज्ञान शाखेत सुमारे   ७ लाख  ६० हजार ०४६ विद्यार्थी  बसले  आहेत .

 

परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपरच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी २.३० पर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे.

प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. या विषयासाठी १,९४,४३९ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आलीये.

 

ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे अवाहन शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना केलेय.

 

शाखानिहाय  विद्यार्थी असे :

 

विज्ञान शाखा: ७,६०,०४६

 

कला शाखा: ३,८१,९८२

 

वाणिज्य: ३,२९,९०५

 

वोकेशनल: ३७,२२६

 

आय टी आय: ४७५०

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment