धुळे : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1, धुळे अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून 22 रिक्त पदांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे पद विविध अंगणवाडी केंद्रांवर उपलब्ध असून, अर्ज प्रक्रिया 5 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.
याबाबतची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपाली देसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. त्यांनी सांगितले की, 19 रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांसाठी तसेच 3 रिक्त अंगणवाडी सेविका पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित अंगणवाडी केंद्र क्रमांकांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
अंगणवाडी मदतनीस पदांसाठी रिक्त केंद्रे
मोरशेवडी 1, पुरमेपाडा 2, बेंद्रेपाडा, कुळथा 2, नरव्हाळ 3, मांडळ 1, मांडळ 2, सावळदे, गरताड 1, गरताड 2, जुनवणे 2, नाणे 2, सिताणे 2, हेंद्रुण 2, शिरुड 3, बोदगाव, वेल्हाणे 3, निमगुळ 2
अंगणवाडी सेविका पदांसाठी रिक्त केंद्रे
- रानमळा 1
- चांदे 1
- मोरदड 1
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी उमेदवार महिला असाव्यात. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे (विधवा महिलांसाठी 40 वर्षांपर्यंत) असावी. अर्जदारास किमान 12वी पास असावे. तसेच, 2 अपत्यापेक्षा जास्त नसावे, असे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांना स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि अन्य संबंधित दस्तऐवज आवश्यक असतील.
अल्पसंख्याक समाजासाठी विशेष नियम : जर कार्यक्षेत्र 50 टक्क्यांपेक्षा जास्त अल्पसंख्याक समाजाचे असलेल्या अंगणवाडी केंद्रांवर पद रिक्त असतील, तर अर्जदारांनी उर्दु लेखी आणि तोंडी ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत संबंधित ग्रामपंचायतीने अर्ज मागवावेत.
अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाची माहिती: उमेदवारांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय किंवा बालविकास प्रकल्प कार्यालय येथे अर्ज सादर करावेत. अर्ज नमुना ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. अर्ज प्रक्रिया 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालेल. तरी संबंधित महिलांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन दिपाली देसले यांनी केले आहे.