नवी दिल्ली : चॅटजीपीटीच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी तसेच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुगलने बार्ड ही प्रणाली विकसित केली. मात्र असे करताना गुगलने प्ले स्टोअरच्या धोरणांचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले असून १,३३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी गुगलने न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तेथेही दिलासा न मिळाल्याने गुगलला ३० दिवसांच्या आत दंड भरावा लागणार आहे.