सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन टीमने ईशान्य फ्रंटियर रेल्वेचा अधिकारी तसेच एका खासगी कंपनीतील काही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि दिल्लीत 16 ठिकाणी छापे टाकून सीबीआयने ही कारवाई केली आहे. सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वेचे तत्कालीन उपअभियंता आणि एका खासगी कंपनीसह आठ आरोपींविरुद्ध लाचखोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि दिल्लीत अजूनही 16 ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. सीबीआयने या ठिकाणांहून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे लाचखोरी प्रकरणाशी संबंधित आहेत. कागदपत्रांच्या छाननीत आरोपींनी त्यांच्या संबंधित मालमत्तेत बेकायदेशीरपणे गुंतवणूक केल्याचे समोर आले.