Hatnur Dam : हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले ; तापीत २८ हजार ७५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

---Advertisement---

 

भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, सध्या तापी नदीपात्रात २८,०७५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

धरणाच्या ४१ दरवाजांपैकी १८ दरवाजे विसर्गासाठी उघडण्यात आले आहेत. यातील २ दरवाजे पूर्णपणे तर उर्वरित १६ दरवाजे १ मीटरने उघडून १२६१ क्यूमेक म्हणजेच ४४,५३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

१७ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता धरणाची पाणीपातळी २११.२२ मीटर इतकी नोंदवली गेली आहे, तर पूर्ण क्षमतेची पातळी २१४.०० मीटर आहे. सध्या धरणात एकूण २४४.८० दशलक्ष घनमीटर (६३.०९%) साठा असून त्यापैकी १११.८० दशलक्ष घनमीटर (४३.८४%) जिवंत साठा आहे.

कालव्याद्वारे २.८३ क्यूमेक (१०० क्यूसेक) पाणी सोडले जात असून आर.एस. गेटद्वारे कोणताही विसर्ग नाही. धरण परिसरात आज ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतचे एकूण पर्जन्यमान ३४७ मिमी झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---