---Advertisement---

बापरे ! एकाच महिन्यात १९ अल्पवयीन मुलींचे अपहरण, दरदिवसा दोन ते तीन घटना

---Advertisement---

धुळे : शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनेत वाढ होताना दिसत आहेत. शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अल्पवयीन मुलीस काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले जाते. दरदिवसा जिल्ह्यातून दोन ते तीन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद पोलिस ठाण्यात आढळून येते. एप्रिल महिन्यात १९ हून अधिक अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे.

दहा घरफोडींमुळे नागरिकांमध्ये भीती

धुळे : जिल्ह्यात दिवसा-रात्री घरफोडींचे सत्र सुरूच आहेत. शहरीसह ग्रामीण भागात चोरट्यांकडून घरफोड्या केल्या जात आहे. त्यामुळे नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले आहेत. तसेच चोरट्यांनी शासकीय कार्यालयासह देवांची मंदिरे देखील सोडले नाहीत. चोरट्यांनी जिल्हा पोलिस प्रशासनापुढे आव्हान उभे केले आहेत. एप्रिल महिन्यात १० हून अधिक घरफोड्या झाल्या आहेत. त्यामुळे भीतीचे निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात आत्महत्येच्या सर्वाधिक घटना

धुळे : शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांतून आत्महत्येच्या घटना पोलिस ठाण्यातील नोंदीत आढळून येतात. यामध्ये नैराश्यातून गळफास, विषारी औषध प्राशनाने, विहीर व नदीत बुडून यांसह अन्य कारणांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात १५ हून अधिक जणांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आपले जीवन संपविले आहेत. अशा प्रकरणांची पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment