तरुण भारत लाईव्ह । जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीवरुन महाविकास आघाडीतच राडा झाल्याने बाजार समितीत एकच गर्दी झाली होती. दरम्यान या ठिकाणी वाद पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या खिशातील २ लाखात लंपास केल्याची घटना आज दुपारी घडली.
जळगाव तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी पुंजू मराठे यांनी विकलेला शेतमालाचे २ लाख रुपये खिशातून अज्ञात चोरट्याने लंपास केले.