---Advertisement---

Jalgaon Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार

---Advertisement---

जळगाव : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळ सोमवारी (२६ मे) रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रेम धीरज ठाकूर (वय २०, रा. शिंदे नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रानुसार, जळगाव शहरातील शिंदे नगरात प्रेम धीरज ठाकूर (२०) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. टुर आणि ट्रॅव्हल्सचे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो सोमवारी (२६ मे) रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शिंदे नगरातून अजिंठा चौकाकडे जात होता, दरम्यान, अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला समोरून जबर धडक दिली.

या अपघातात प्रेम हा जागीच ठार झाला. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सट्टा घेणाऱ्या इसमाला अटक

अमळनेर : तालुक्यातील शिरसाळे येथे सट्टा घेणाऱ्या इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तसेच गावठी दारू विकणाऱ्या एकावर कारवाई केली आहे.

शिरसाळे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक व मारवड पोलिसांनी छापा टाकला असता नारायण पुणा कोळी (७१) हा सट्टा जुगाराच्या साहित्यासह रंगेहाथ आढळून आला त्याच्याकडून ८९० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

तसेच मारवड येथील बसस्टँड जवळील गॅरेजच्या मागे मारवड पोलिसांनी छापा टाकला असता मनोहर संभाजी पाटील (४५, गोवर्धन) हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचा पुढील तपास मारवड पोलिस करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment