Murder News : धक्कादायक! किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, पाचोऱ्यात खळबळ

जळगाव : किरकोळ कारणावरून २० वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरात घडली. मंगळवारी (१८ फेब्रुवारी) रात्री शिवजयंती मिरवणुकीनंतर हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेमंत संजय सोनवणे (रा. महात्मा फुले नगर, पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिरवणुकीनंतर रात्री बारानंतर हेमंत सोनवणे बाहेरपुरा येथे असताना त्याचा रोहित लोणारी याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की रोहित लोणारी याने धारदार चाकूने हेमंतच्या पोटात गंभीर वार केले आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील हेमंतला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी जळगाव येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच हेमंतचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी त्वरीत हालचाली करत आरोपी रोहित लोणारी याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पाचोरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.