तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। रिझर्व्ह बँक ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे.आता या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहे. परंतु त्या बँकेत जाऊन इतर नोटांप्रमाणे जमा केल्या जाणार नाही. त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया तयार केली आहे. काय आहे ही प्रक्रिया हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
दोन हजाराच्या नोटा 23 मे पासून बँकांमध्ये बदलण्यास सुरुवात होणार आहे. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी फक्त बँकिंग नियमांचे पालन करावे लागेल, असे केंद्रीय बँकेने म्हटले. RBI च्या म्हणण्यानुसार बँकेच्या शाखेतून 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मचे स्वरूप आरबीआयने जारी केले आहे. विशेष म्हणजे केवळ 2000 च्या नोटा बदलण्यासाठी लोकांना फॉर्म भरावा लागणार आहे.
या फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमचे नाव, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही एक ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवावा लागणार आहे. जर समजा तुम्ही ओळख म्हणून आधार कार्ड देत असाल तर तुम्हाला त्याचा नंबर फॉर्ममध्ये लिहावा लागेल. तसेच इतर कागदपत्रे दिल्यास त्याचा क्रमांक फॉर्मवर लिहिणे आवश्यक आहे.
याशिवाय तुम्हाला 2000 रुपयांच्या किती नोटा बदलून घ्यायच्या आहेत आणि त्यांची किंमत किती आहे हे देखील फॉर्ममध्ये नमूद करावे लागेल. हा फॉर्म बँकांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फार्म भरल्यानंतरच कोणालाही 2000 रुपयांच्या नोटा बदता येणार आहे.