मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचे २००० लवकरच खात्यात जमा होणार असल्याचा निर्णय कृषी विभागाने जाहीर केला आहे.
1642 कोटीची मंजुरी
नमो शेतकरी योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी राज्य सरकाने १६४२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या कृषी विभागामार्फत या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘घरी ये, कोणी नाहीय…’, सख्ख्या बहिणींनी व्यापाऱ्याला बोलावलं अन्; वाचा नेमकं काय घडलं?
आतापर्यंत ५ हप्त्यांची रक्कम जमा
नमो शेतकरी योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ५ हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे. आता या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठी सहाव्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानात राज्य शासनाच्यावतीने भर घालण्याच्या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे.