Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडी म्हणून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकमत झाले आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने जोर बैठकाही सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडी मजबूत असल्याचं आघाडीच्या नेत्यांकडूनही सांगितलं जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीवर भाजपच्या नेत्याने मोठा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
कुणी आणि काय केलाय दावा?
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरे गटाने आधी एकत्र राहावं. 2024 पर्यंत ठाकरेंच्या ठिकऱ्या उडालेल्या असतील. 2024 पर्यंत महविकास आघाडी टिकणार नाही. महाविकास आघाडीत अनेक मतभेद आहेत. उगाच ठाकरी पॅटर्न राबवून काही फायदा होणार नाही, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनीही मुंबई महापालिका आम्हीच जिंकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. भाजप प्रदेश कार्यकारणी सतत चालते. राज्यात वेगवेगळ्या बैठका होत असतात. कुठले कार्यक्रम राबवले आणि काय राबवण्यात येतात याचा आढावा घेतला जातो. बैठकीचा आणि कर्नाटकातील पराभवाचा काहीच संबंध नाही. कर्नाटक पराभवानंतर बैठक होतेय इतकंच. निवडणुकीची तयारी बैठकीत होत नसते, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
ठाकरे गटाच्या बैठकी, दौरे होउद्या. पण राज्यात भाजपचेच सरकार येणार. देशात या अगोदरही तिसरे आघाडी झाली होती. पण पंतप्रधान पदावरून वाद होतो अन् आघाडी फुटते. आता आम्हाला खात्री आहे की, मुबंई महापालिका झालेल्या घोटाळा पाहता मुबई महापालिका आमच्या ताब्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.
आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे तितकेच मह्त्वाचे आहे.