जळगाव : सायबर ठग नेहमी ग्राहकांच्या बँक खात्यावरील रक्कमेवर डोळा ठेऊन असतात. यासाठी ते नवनवीत फंड्यांचा वापर करत ग्राहकांना जाळ्यात अडकवितात. एका ठगाने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये डॉक्टराची अपाईंटमेंट मिळवून देतो, अशी बतावणी केली. अॅपमध्ये तक्रारदाराची वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यामधून सुमारे १ लाख ७९ हजार ५ रुपये ऑनलाईन काढुन गंडा घातला.
४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२५ दरम्यान भडगाव तालुक्यातील तक्रारदार यांना त्यांच्या मोबाईलवर दुसऱ्या एका मोबाईलवरुन फोन आला. अज्ञात इसम म्हणाला, डॉ. संजय अग्रवाल हिंदुजा हॉस्पिटल, माहीम मुंबई यांची अपाईंटमेंट मिळवून देतो, अशी थाप दिली. त्यानंतर त्याने तक्रारदार यांना त्यांच्या मोबाईलमध्ये अॅप ईन्स्टॉल करण्यास सांगितले. वैयक्तिक माहिती भरण्याचा सल्ला दिला. बँक खाते, एटीएम कार्ड सीव्हीव्ही तसेच क्रमांक याबद्दल माहितीची त्याने विचारपूस केली.
तक्रारदार यांची वैयक्तिक माहिती प्राप्त केल्यानंतर ठगाने परस्पर बँक खात्यामधून सुमारे १ लाख ७९ हजार ५ रुपये काढुन घेतले. पैशांचे ऑनलाइन पेंमेट झाल्याचा मेजेस आल्यानंतर तक्रारदार अवाक् झाले. तत्काळ त्यांनी भडगाव पोलीस ठाणे गाठुन कैफियत मांडली. फसवणुकीचा दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहेत.
असे केले आकर्षित
बनावट ओळखपत्र, लेटरपॅड आणि बनावट अपाईंटमेंट लेटर दाखविले. रेल्वेत नोकरी लावुन देणार, म्हाडामध्ये फ्लॅट देऊ, रेल्वे विभागात टेंडर मिळवून देऊ, चार चाकी वाहने रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांकडे भाड्याने लावुन देऊ अशी विविध प्रलोभने दाखविली. त्यानंतर दाम्पत्याने एक दोन नव्हे तर तब्बल २१ जणांना गंडा घातला. आमिष आणि झटपट अधिक पैसे कमविण्याच्या मानसिकतेतून या तक्रारदारांनी हातातील रोकडही गमविली. फसवणूक झाल्याची खात्री पटत्यानंतर या प्रकरणी तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात हितेश संघवी (वय ४९), तसेच अर्पिता संघवी (वय ४५, हमु नवीमुंबई) यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासकामी वर्ग करण्यात आला आहे.
२१ जणांना ५५ लाखांचा गंडा
एका दाम्पत्याने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालयीन स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी केली. २३ नोव्हेंबर २०२४ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संशयित दाम्पत्याने तक्रारदाराकडून १३ लाख ३८ हजार तसेच इतरांकडून ४२ लाख २२ हजार अशी एकूण ५५ लाख ६० हजार रुपये स्विकारत चुना लावला.