भुसावळ : भारतीय रेल्वेतील बिलासपूर विभागातील कोतरलिया स्थानकावर चौथ्या मार्गाला कनेक्टिव्हिटी जोडण्याचे काम केले जात असल्याने रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. या मुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल २२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे हमसफर, भुवनेश्वर, हावडा, शालिमार यासह २२ रेल्वे गाड्यांचा समावेश असून, वेळापत्रक पाहून प्रवासाला निघण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या गाड्या झाल्या रद्द गाडी २०८२२ सांत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस १२ व १९ एप्रिलला रद्द तर गाडी २०८२१ पुणे-सांत्रागाची हमसफर एक्सप्रेस १४ व २१ रोजी रद्द, गाडी १२८८० भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस १० ते २१ एप्रिलपर्यत रद्द, गाडी १२८७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर साप्ताहिक एक्सप्रेस १२ ते २३ पर्यंत रद्द, गाडी १२८७० हावडा-मुंबई साप्ताहिक एक्सप्रेस ११ आणि १८ एप्रिलला रद्द, गाडी १२८६९ मुंबई-हावडा साप्ताहिक एक्सप्रेस १३ व २० रोजी रद्द, गाडी १२१५१ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार समरसता द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ९ ते १७ एप्रिलला रद्द, गाडी १२१५२ शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास ११ ते १९ रद्द, गाडी २२८९४ हावडा-साई नगर शिर्डी साप्ताहिक एक्सप्रेस १० व १७ रोजी रद्द, गाडी २२८९३ साई नगर शिर्डी-हावडा साप्ताहिक एक्सप्रेस १२ व १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.

गाडी १२८१२ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दि. ११ ते १९ रद्द, गाडी क्रमांक १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी १३ ते २१ रद्द, गाडी १२१२९ पुणे-हावडा एक्सप्रेस ही गाडी ११ ते २४ रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२१३० हावडा-पुणे एक्सप्रेस ही गाडी ११ ते २४ पर्यंत रद्द, गाडी १२८५९ मुंबई-हावडा एक्सप्रेस ही गाडी १३ ते २६ पर्यंत रद्द, गाडी १२८६० हावडा-मुंबई एक्सप्रेस ११ ते २४ पर्यंत रद्द, गाडी १२२२२ हावडा-पुणे द्वि साप्ताहिक दुरांतो एक्सप्रेस १० ते १९ पर्यंत रद्द, गाडी १२२२१ पुणे-हावडा द्वि साप्ताहिक दुरांतो एक्सप्रेस १२ ते २१ पर्यंत रद्द. गाडी १२९०५ पोरबंदर-शालिमार द्वि साप्ताहिक एक्सप्रेस ९ ते १७पर्यंत रद्द, गाडी १२९०६ शालिमार – पोरबंदर द्वि साप्ताहिक एक्सप्रेस ११ ते १९ पर्यंत रद्द, गाडी १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस ११ ते २२ पर्यत रद्द, गाडी १२१०२ शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १३ ते २४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये सुलभता आणि वेळेची बचत होईल. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
२२ प्रवासी गाड्या रद्द
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधील बिलासपूर विभागातील रायगढ़ ते झारसुगुडा खंड दरम्यान कोतरलिया स्थानकावर चौथ्या मार्गाला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पूर्व-नॉन इंटरलॉकिंग, नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येत आहे. या कामासाठी भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गाड्या रद्द झाल्याने आणि अनेक प्रवाशांनी दोन महिने अगोदरच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.