---Advertisement---

‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत २३ वर्षीय विवाहितेचा विनयभंग

---Advertisement---

जळगाव : लग्नासाठी आग्रह धरत तरुणाने विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, तालुक्यातील एका गावात विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी विवाहिता सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरासमोर उभी असताना संशयीत किरण हिरामण पाटील याने विवाहितेला उद्देशून ‘तु माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत विवाहितेचा डावा हात धरुन तिचा विनयभंग केला.

शिवाय विवाहितेचे वडील, तसेच चुलत भाऊ यांना शिवीगाळ करण्यात आली तसेच आरोपीने विवाहितेच्या पती ला फोनवरुन दमदाटी केली. या घटने प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर विवाहित तरुणीने शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने किरण हिरामण पाटील (कानळदा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment