नवी दिल्ली : पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. बाजारात अनेक इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. मात्र यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे, त्यांची किंमत आणि रेंज! हीच बाब हेरून भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी iVoomi Energy ने S1 इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन सीरीज लाँच केली आहे. त्यांच्या किंमती 69,999 रुपयांपासून सुरू होतात. या स्कूटरची खास गोष्ट म्हणजे एकदा फूल चार्ज केल्यानंतर ती 240 किमी पर्यंत धावू शकते, असे कंपनीचा दावा आहे.
iVoomi S1 240 इलेक्ट्रिक स्कूटर ही टॉप-स्पेक व्हर्जन आहे आणि 240 किमी रेंज (IDC) देऊ शकते. मॉडेलला 4.2 kWh ट्विन बॅटरी पॅक मिळतो आणि अतिरिक्त टॉर्कसह 2.5 kW मोटर (3.3 bhp) देण्यात आली आहे. याउलट, एंट्री-लेव्हल S1 80 इलेक्ट्रिक स्कूटर 1.5 kWh बॅटरी पॅकसह करते, जे एका चार्जवर 80 किमी (IDC) ची रेंज देऊ शकते.
S1 80 मध्ये हब-माउंटेड 2.5 kW मोटर देखील मिळते, त्याचा टॉप स्पीड 55 किमी प्रति तास असल्याचा दावा करण्यात आला आहे. iVoomi Energy आपल्या डीलरशिप नेटवर्कवर 1 डिसेंबर 2022 पासून नवीन S1 ई-स्कूटर रेंजची विक्री सुरू करणार आहे. सर्व व्हेरिएंटमध्ये इको, रायडर आणि स्पोर्ट तीन रायडिंग मोड्स येतात. ही स्कूटर पीकॉक ब्लू, नाईट मरून आणि डस्की ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. मॉडेलमध्ये जीपीएस ट्रॅकर आणि मॉनिटरिंग सिस्टमसह नवीन ‘फाइंड माय राइड’ फीचर्स देखील आहे.