Lakshmi Virani : मैत्रिणींसह फिरायला गेली अन् नको ते घडलं, जळगावात शोककळा

---Advertisement---

 

Lakshmi Virani : मैत्रिणींसह फिरायला गेलेल्या जळगावातील २५ वर्षीय तरुणीचा शिमला येथे दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लक्ष्मी रामचंद्र विराणी (वय २५, रा. मोहाडी रोड, जळगाव शहर) असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे जळगाव शहरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मी विराणी या पुण्यातील खासगी कंपनीत कामाला होत्या. कंपनीतील काही मैत्रिणींसह त्या शिमला येथे फिरायला गेल्या होत्या. बुधवारी, तेथे बसमधून जात असताना मुसळधार पावसामुळे डोंगरावरून बसवर दरड कोसळली. त्यात लक्ष्मी यांच्यासह त्यांच्या – शेजारी बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीने शिमला जिल्हा प्रशासन आणि हिमाचल प्रदेश शासनाशी संपर्क साधून आवश्यक समन्वय साधला. जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी त्वरित संपर्क साधून पुढील कार्यवाही केली आहे.

जळगावात शोककळा

लक्ष्मी विराणी यांचा मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून, आज शवविच्छेदनानंतर तो त्यांचे सहकारी तरुण रामचंदानी (२६) यांच्या ताब्यात देण्यात येईल. त्यानंतर मृतदेह जळगावला पाठवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लक्ष्मी विराणी यांच्या कुटुंबीय, सहकारी आणि मित्रपरिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---