मुंबई : मुंबईतील २६/११ हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वच क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. मुंबईतील २६/११ हल्ल्याला आज १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईकर आजही ते तीन दिवस विसरलेले नाहीत. समुद्रमार्गे दहशतवादी मुंबईत पोहोचले आणि त्यांनी ताज हॉटेलसह इतर अनेक ठिकाणी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. या हल्ल्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
हल्ल्यानिमित्त दिव्याज फाऊंडेशन आणि अमृता फडणवीस यांच्यावतीने ‘गेटवे ऑफ इंडिया, मुंबई’ येथे ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वच क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थिती लावणार आहेत.
ग्लोबल पीस ऑनर’या कार्यक्रमाचे आयोजन अमृता फडणवीस यांनी केले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती लावणार आहेत. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत. शाहरुख खानसह टायगर श्रॉफ अन्य सेलिब्रिटीही उपस्थिती लावणार आहेत. यावेळी देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी सहपत्नी कार्यक्रमाल उपस्थित राहणार आहे. अमृता फडणवीसांनी याविषयीची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेली आहे.
तीन दिवस चाललेल्या चकमकीत सर्व दहशतवादी मारले गेले. त्यातील एक अजमल आमिर कसाबला जिवंत पकडले होते. कसाबला २०१२ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा समावेश देशातीलच नाही तर जगभरातील मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये होतो. थरकाप उडवणाऱ्या या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाले आहेत. मुंबईकर आजही ते तीन दिवस विसरलेले नाहीत