ब्रेकिंग न्यूज : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदची राजकीय एन्ट्री

नवी दिल्ली : मुंबईतील २६ / ११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदने पाकिस्तानच्या राजकीय रिंगणात उडी मारली आहे. पाकिस्तानात फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात दहशतवादी हाफीज सईदचा पक्ष पाकिस्तान मरकजी मुस्लीम लीग मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने देशात प्रत्येक राष्ट्रीय, विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. हाफीजनं त्याचा मुलगा तल्हा सईदलाही उमेदवार बनवलं आहे.

हाफीजनं पाकिस्तानी जनतेला आकर्षित करण्यासाठी राजकीय अजेंडा समोर आणला आहे. त्यात पार्टीने निवडणुकीत पाकिस्तानला इस्लामिक स्टेट बनवण्याचं स्वप्न दाखवत आहे. पाकिस्तान मरकजी मुस्लीम लीग हा एक राजकीय पक्ष आहे. ज्याचे चिन्ह खुर्ची आहे. पाकिस्तानला इस्लामिक देश बनवण्याचा सईदचा इरादा आहे.

हाफीज मोहम्मद सईद हा मुंबईतील २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. अमेरिकेनेही त्याच्या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. यूएसनं त्याच्यावर १ कोटी डॉलरचे बक्षिस ठेवले आहे. सध्या लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफीज सईद, जमात उद दावाचे काही नेते २०१९ पासून जेलमध्ये आहेत. आता हाफीद सईदचा मुलगा राजकारणात उतरला आहे. तो लाहोरच्या जागेवरून निवडणुकीच्या मैदानात आहे.