---Advertisement---
जळगाव : पारोळा तालुक्यातील होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
होळपिंप्री येथील घरातील कर्ता तरुण शेतकरी कल्पेश गोरख पाटील हे विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरल्याने विहिरीत पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे वडील गोरख पाटील यांनी बराच वेळ होऊन गेला तरी मुलगा परत आला नाही, हे बघण्यासाठी विहिरीजवळ गेले असता ही घटना उघडकीस आली. मात्र संध्याकाळ झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांना बोलवून रात्री मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला.
रात्रीच्या अंधारामुळे मृतदेह सापडू शकला नाही. रविवारी सकाळी पोहोण्यासाठी तरबेज असलेल्या व्यक्तींना बोलावून कल्पेश पाटील यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अजित पाटील यांनी पारोळा पोलिसांत खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिक्षक व पत्नी अपघातात गंभीर
अमळनेर : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी उलटल्याने एक शिक्षक आणि पत्नी गंभीर झाल्याची घटना २८ रोजी टाकरखेडा रस्त्यावर किल्ल्याजवळ घडली. राजमल मोहनलाल संचेती हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवर भरधाव वेगाने चांदणी कुन्हे गावाकडून अमळनेरकडे येत असताना त्यांची दुचाकी उलटी होऊन ते जोरात रस्त्यावर आदळले.
त्यांच्या नाकातोंडातून रक्त आले. तेथे उपस्थित असलेले दिलीप सोनवणे यांनी एका चारचाकीतून डॉ. अनिल त्यांना शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले. २७ रोजी प्रताप कॉलेजजवळील रेल्वे वासरे उड्डाणपुलावरून येथील तरुण वेगाने दुचाकी चालवताना कठड्याला ठोकला जाऊन पुलाच्या खाली पडला.
---Advertisement---