22 व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे 5 ते 7 जानेवारीस आयोजन

जळगाव : भारतीय अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने 5, 6,7 जानेवारी 2024 रोजी करण्यात येत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष्ा डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी आज गुरूवार, 7 डिसेंबर रोजी

घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पुढे माहितीत देताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी 7 ते 11 या वेळेत संपन्न होणार आहे.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानंच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या 22 व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, भारतीय जीवन विमा निगम, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स प्रा. लि., जाई काजळ, बँक ऑफ महाराष्ट्र, वेगा केमिकल्स प्रा. लि. होस्टिंग ड्युटी अर्थात चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. व संस्कृती मंत्रालय भारत सरकार हे आहेत.

या कलावंताचा आहे सहभाग

महोत्सवाची सुरवात 5 जानेवारीस होईल. प्रथम सत्रात झीटिव्ही वरील सारेगमप लिटील चॅम्प्स बालकलाकार ज्ञानेश्वरी घाडगे हिच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. तिला तिची बहिण कार्तिकी घाडगे संवादिनीवर तर रामकृष्ण करंबेळकर तबल्यावर साथसंगत करतील. व्दितीय सत्रात लखनऊ घराण्याचे प्रतिनिधीत्व करणारे कै.पंडित मिश्रा याचे चिरंजीव व स्नुषा अनुज मिश्रा व नेहा मिश्रा यांच्या कथक जुगलबंदीने सादर होईल. त्यांना तबल्याची साथ लखनऊचे पं. विवेक मिश्रा, सतारची साथ पंडिता अंजल गुर्जर, त्याचप्रमाणे सरोद, संवादिनी व पढंतसाठी हृदय देसाई हे साथ संगत करतील.

द्वितीय दिनाच्या दुसऱ्या सत्रात मुंबच्या गायिका रौकिणी गुप्ता या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना तबल्यावर आशिष राघवानी तर संवादिनीवर दीपक मराठे साथ संगत करतील. दुसऱ्या सत्रात सोनी टिव्हीवरील इंडिया गॉट टॅलेंटच्या सीजन 10 मध्ये सादर होत असलेल्या रागा फ्युजन बँड चे सादरीकरण  होईल. यामध्ये अजय तिवारी (गायन), अमृतांशु दत्ता (स्लाईड गिटार), जयंत पटनाईक (पर्क्युशनिस्ट), हर्षित शंकर (बासरी), प्रीतम बोरुआ (बेस गिटारीस्ट) व जेरिन जयसन (ड्रमर) हे कलाकार आपली कला सादर करतील.

तृतीय दिनाचे प्रथम सत्र हे सहगायनाने संपन्न होणार असून पं. राजन साजन मिश्रा यांची पुढची पिढी अर्थात पं. रितेश व पं. रजनीश मिश्रा यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय युगल गायनाने संपन्न होईल. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनीवर अभिषेक रवंदे साथ संगत करतील. समारोपाच्या सत्रात पं. आदित्य ओक (संवादिनी) निनाद मुळावकर (बासरी) व विशाल धुमाळ (किबोर्ड) यांच्या जुगलबंदीने 22 व्या बालगंधर्व महोत्सवाची सांगता होईल त्यांना तबल्यावर प्रथित यश तबलावादक विनायक नेटके साथ संगत करतील.

यावेळी दिपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, दीपीका चांदोरकर, प्रा. शरदचंद्र छापेकर, डॉ. अपर्णा भट, प्रसन्न भुरे,अर्थव मुंडले उपस्थित होते.