3 वर्षात जिंकले 2 पॅरालिम्पिक पदक, जाणून घ्या कोण आहेत प्रवीण कुमार ?

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी होताना दिसतेय. शुक्रवारी प्रवीण कुमार (T44) याने पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. पॅरिसमधील हे भारताचे सहावे सुवर्ण ठरले आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रथमच भारताने सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. यापूर्वी टोकियोमध्ये भारताने ५ सुवर्णपदके जिंकली होती.

प्रवीणकुमार यांचा संघर्ष
प्रवीण कुमार हे उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रहिवासी असून त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचा एक पाय लहान होता. मात्र, असे असतानाही त्यांनी हिंमत खचू दिली नाही. प्रवीण कुमारला एका पायात नक्कीच समस्या होती पण खेळाबद्दलची त्याची आवड अप्रतिम होती. विशेष म्हणजे प्रवीणला व्हॉलीबॉलमध्ये खूप रस होता पण या खेळाडूने पहिल्यांदा उंच उडी स्पर्धेत भाग घेतल्याने त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडला.

प्रवीण कुमारने सर्वसाधारण गटातील उंच उडी स्पर्धेत भाग घेतला आणि तिथून लोकांना त्याच्या प्रतिभेची ओळख झाली. यानंतर पॅरा ॲथलेटिक्स प्रशिक्षक डॉ.सत्यपाल सिंग यांनी प्रवीणमध्ये सुधारणा केली. प्रवीण कुमारने कठोर परिश्रमाच्या जोरावर 2019 मध्ये स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले. 2021 मध्ये, या खेळाडूने दुबई येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स फाझा ग्रांप्रीमध्ये सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले.

प्रवीण कुमारने टोकियो येथे पहिले पॅरालिम्पिक खेळले आणि पदार्पणातच त्याने २.०७ मीटर उडी मारून रौप्य पदक जिंकले. यावेळी प्रवीणने .01 अधिक उडी मारली आणि सुवर्णपदक त्याच्या गळ्यात सजले. प्रवीण कुमारने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी आतापर्यंत तीन मोठी पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये पॅरालिम्पिकच्या सुवर्ण आणि रौप्यपदकाशिवाय आशियाई पॅरा गेम्समधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे.