---Advertisement---

IPL 2025 : 3 स्टार खेळाडू बाहेर, परतले राष्ट्रीय कर्तव्यावर

---Advertisement---

IPL 2025 : आयपीएल २०२५ हंगामात आता प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. हे सामने २९ मे पासून खेळवले जातील. दुसरीकडे, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात २९ मे रोजी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळला जाणार आहे.

इंग्लंडने या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग ११ संघाची घोषणा केली आहे. ज्यात तरुण फलंदाज हॅरी ब्रूक पहिल्यांदाच एकदिवसीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. विशेष म्हणजे या प्लेइंग ११ मध्ये ३ खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे, जे आयपीएल २०२५ मध्ये खेळत होते. त्यांचा संघ प्लेऑफसाठी पात्रही ठरला आहे. परंतु हे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यामुळे भारत सोडून त्यांच्या संघात सामील झाले आहेत.

इंग्लंडने जाहीर केलेल्या प्लेइंग ११ मध्ये, जेमी स्मिथला बेन डकेटसह सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे, तर अनुभवी जो रूट तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. त्याच वेळी, नुकताच आयपीएल २०२५ मधून परतलेला जोस बटलर फलंदाजीसोबतच विकेटकीपिंगमध्येही महत्त्वाची भूमिका बजावेल. जोस बटलर गुजरात टायटन्सचा भाग होता. जो प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. याशिवाय, आरसीबीचे खेळाडू जेकब बेथेल आणि विल जॅक्स देखील या प्लेइंग ११ चा भाग आहेत.

सीएसकेचा गोलंदाज जेमी ओव्हरटनचीही प्लेइंग ११ मध्ये निवड झाली आहे. परंतु सीएसके प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. २०२३ च्या विश्वचषक आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील निराशाजनक कामगिरीनंतर, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंड या मलिकडे महत्त्वाच्या दिशेने बघत आहेत.


विशेषतः ही मालिका हॅरी ब्रूकसाठी एक मोठी संधी आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोस बटलरच्या अनुपस्थितीत त्याने शानदार कर्णधारपद भूषवले होते आणि आता तो कायमस्वरूपी एकदिवसीय कर्णधार म्हणून आपली छाप पाडण्यास सज्ज आहे. म्हणजे , तो आता पूर्णवेळ कर्णधार झाला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment