जळगाव जिल्ह्यात आढळले ३० फूट खोल भुयार, नागरिकांची घटनास्थळी धाव

---Advertisement---

 

जळगाव : एरंडोलच्या गढी परिसरात संजय पुरुषोत्तम सोनार हा इसम कपडे वाळायला टाकण्यासाठी जिना चढत असताना अचानक जिना कोसळून भुयार आढळून आले. यावेळी सोनार हा सुद्धा भुयारात पडला. दरम्यान, भुयार पडल्याचे समजताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धाव घेतली.

नगरपालिका प्रशासनाची घटनास्थळी धाव


घटनेची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या इसमाला बाहेर काढले. या भुयाराचा वरचा भाग चार ते पाच फूट व्यासाचा असून हे भुयार ३० ते ४० फूट खोल आहे. त्यानंतर मुरूम टाकून हे भुयार बुजवण्यात आले.

एरंडोल हे ऐतिहासिक गाव

एरंडोल हे ऐतिहासिक गाव असून याआधी काही वर्षापूर्वी राजेंद्र जयसिंग परदेशी यांच्या घरासमोर असलेल्या ओटा कोसळून भुयार समोर आले होते. याआधी शहराच्या विविध भागात भुयारी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ही भुयारे पूर्वीच्या काळात धान्य साठवण्याची कोठारे असावीत, अशी शक्यता असून, असे प्रकार या आधीही समोर आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---