छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमी कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू असताना दोन गटांमध्ये झालेल्या वादातून जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार समोर आला होता. यामध्ये झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी आतापर्यंत ३२ आरोपींनी अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. ते आम्ही बघत आहोत. आतापर्यंत आम्ही ३२ लोकांना अटक केलेली आहे. ८० पॉझिटिव्ह आयडेंटिफिकेशन आमच्याकडे आलेलं आहे. बरेचसे लोक फरार आहेत. या दंगलीत जेवढे लोक सामील होते, त्या सगळ्यांना पोलिस अटक करणार आणि त्यांना न्यायालयापुढे हजर करणार.”
यादरम्यान, परिसरातील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश होता. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली की, “या हिंसाचारातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही ८ टीम तयार केल्या आहेत, ज्या हल्लेखोरांना अटक करतील. त्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई सुरु आहे.”