पुणे । पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहगाव परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर दोन नराधमांनी बंदुकीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार केला. विशेष म्हणजे, या आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचाही प्रयत्न केला.
पीडित महिला जिम ट्रेनिंगसाठी एका ट्रेनरकडे गेल्यानंतर तिची आरोपींशी ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत, ५५ वर्षीय व ३० वर्षीय दोघांनी महिलेला धमकावत अत्याचार केला. त्यांनी अत्याचाराचे व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड केले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. या गुन्ह्यात एका महिलेलाही आरोपी ठरवण्यात आले आहे.
पीडितेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर अत्याचार, धमकी व धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू
पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.