Nandurbar Crime : कपडे घेण्यावरून डिवचले अन् झाला वाद, ३२ वर्षीय तरुणाला भररस्त्यात चाकूने भोसकलं

---Advertisement---

 

Nandurbar Crime : नंदुरबार शहरात दोन गटात झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयेश भिल (अंदाजे वय ३२, ) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली फिर्याद अजय दारासिंग पवार याने दिली. अजय व मित्र जयेश भिल हे सिंधी कॉलनीतील दुकानात कपडे घेत असतांना त्या ठिकाणी सूर्यकांत सुधाकर मराठे व चेतन चौधरी हे आले. त्यांनी तुम्ही कधीपासून शोरूममधून कपडे घेऊ लागले असे सांगून त्यांना डिवचले.

त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. वादानंतर अजय व जयेश हे तेथून दुचाकीवर निघून जात असताना सूर्यकांत व चेतन तेथे आले. सूर्यकांत याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून चाकू काढून जयेश याच्या पोटावर व छातीवर वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला.

जयेशला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादम्यान मृत्यू झाला. याबाबत सूर्यकांत सुधाकर मराठे व चेतन चौधरी रा. नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपनगर पोलिसात आणि शहर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी एका संशयिताला अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जमावाविरुद्ध गुन्हा…


दुसरी फिर्याद महिलेने दिली. मंगळवारी रात्री अक्षय राजू वळवी व इतर ९ जण रायसिंगपुरा भागातील घरात अचानक घुसले. त्यांनी हत्यारांचा धाक दाखवून आरडाओरड करीत शिवीगाळ केली. घरात तोडफोड केली.

यावेळी घरात असलेल्या दोन्ही महिलांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन, तोडून नेली, विरोध केला असता चाकूने वार करून हाताला दुखापत केली. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून अक्षय वळवी व इतरांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---