---Advertisement---

संतापजनक! वृद्धाकडून 35 वर्षीय अपंग तरुणावर अत्याचार; पाचोऱ्यातील घटना

---Advertisement---

पाचोरा : तालुक्यातील एका गावात 71 वर्षीय वृद्धाने 35 वर्षीय अपंग तरुणावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अपंग तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिसात वृद्धाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी वृद्धास अटक केली आहे.

अपंग तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात दि.१८ मार्च रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास आरोपी वृद्धाने फिर्यादिच्या अपंग मुलावर अत्याचार केला. फिर्यादीचा मुलगा हा ५० टक्के अपंग असताना त्याच्याशी गोड बोलुन त्याला गावालगतच्या मक्याच्या शेतात घेऊन जात वृद्धाने त्याच्यावर अत्याचार केला. या वेळी तरुणाने विरोध केला असताना त्यास आरोपीने मारुण टाकण्याची धमकी देत त्याच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, अपंग तरुणाने आरडाओरड केली असता शेतातील लोकांनी धाव घेतली. या वेळी आरोपी वृद्ध घटनास्थळावरून पसार झाला होता, अशी फिर्याद तरुणाच्या वडिलांनी पाचोरा पोलिसात दाखल केली. त्यानुसार आरोपी वृद्ध देवराम भगा सोनवणे ( वय ७१) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment