जळगाव : शुक्रवार, 2 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा देशभर साजरा केला जाणार आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची संस्थापना ही एक हजार वर्षाच्या अंधकारानंतर भारतमातेच्या इतिहासातील सोनेरी पहाट होती. या सुवर्ण क्षणाला यावर्षी ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीला 350 वर्षे पूर्ण होत आहे. क्यूआर कोड स्कॅन करून घरबसल्या नागरिकांना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे स्टीकर देण्यात येणार आहे.
शहरातील सर्व नागरिकांच्या दरवाजावर लावण्यासाठी एक स्टिकर देण्यात येणार आहे. स्टिकर पाहिजे असल्यास, आपण आपल्या गल्लीमध्ये, सोसायटीत, वार्डात लावण्यास उत्सुक असाल तर 9359838701 या नंबर वर संपर्क करावा. स्टिकर पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अनुलोमतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाणार असून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, राजेन्द्र नन्नवरे, ललित चौधरी , दीपक परदेशी, गिरीश कुलकर्णी आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात पोवाडा कार्यक्रम, आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहीद सैनिक सन्मान कार्यक्रम, किल्ले बांधणी स्पर्धा असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकसंदर्भात घराघरात चर्चा होणे व नव्या पिढीला शिवाजी महाराज अभ्यासावे ही जिज्ञासा त्यांच्यात उत्पन्न होणे यासाठी ही मोहीम या निमित्ताने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या विषयाचा जागर करणार आहोत. विविध स्पर्धा, पोवाडा कार्यक्रम, प्रतिमा पूजन, शिवचरित्र व्याख्यान उपक्रम शिवराज्याभिषेक सोहळा नियोजन समितीतर्फे केले जाणार आहे.