36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण…

विवाहबाह्य संबंधांमुळे गुन्हेगारी घडण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, नाशिकच्या सिडको परिसरात उघडकीस आलेल्या एका प्रकाराने खळबळ उडाली आहे.

36 वर्षीय विवाहित महिलेचे तिच्याच परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध जुळल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि या घटनेने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

महिला तिच्या पती आणि मुलांसोबत सिडको परिसरात राहत होती. ती आणि अल्पवयीन मुलगा एकमेकांच्या संपर्कात होते. हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोघांनी घर सोडले आणि मुंबई गाठली. मात्र, काही दिवसांनंतर पैसे संपल्यामुळे त्यांनी निर्माणाधीन साईटवर राहण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : आज्जींचा दमदार पराक्रम : तरुणीला जे जमलं नाही ते करून दाखवलं, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, त्यांच्या घरच्यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तपास सुरू असतानाच दोघांनी आर्थिक अडचणींमुळे घरी परतण्याचा निर्णय घेतला. घरी परतल्यानंतर महिलेच्या पतीने पोलिसांत घडल्या प्रकाराची माहिती दिली.

हेही वाचा : मुस्लिम तांत्रिक, अल्पवयीन मुलीला अर्ध्या रात्री बोलावलं अन्; गावात खळबळ

तपासादरम्यान समोर आले की, अल्पवयीन मुलगा आणि महिला संमतीने पळून गेले होते. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्यामुळे महिलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या प्रकरणामागील खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाशिकमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.