---Advertisement---

जळगाव पुन्हा हादरले! घरात घुसून ३७ वर्षीय महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. एक दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचारातून त्या गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भुसावळ तालुक्यात एका ३५ वर्षीय महिलेला ‘घरी सोडतो’, असे सांगून तिघांनी जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय महिलेवर तिच्या घरात एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील ३७ वर्षीय महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुरेश गायकवाड याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

---Advertisement---

पीडित महिला घरी एकटी असताना, संशयित सुरेश गायकवाड सकाळी ९ च्या सुमारास अचानक घरात घुसला. महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. हे होत असताना महिलेने आरडाओरड केल्यामुळे शेजारी धावत आले.

ते पाहून संशयित गायकवाड तेथून पसार झाला. या घटनेची माहिती समजताच, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तत्काळ देवळी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. संशयित सुरेश गायकवाडला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---