4थी उत्तीर्णांना सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! पगार 47,600 पर्यंत

तुमचंही कमी शिक्षण झाले असेल आणि सरकारी नोकरी मिळविण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर येथे सफाईगार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

चौथी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतो. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर त्वरित अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 24 एप्रिल 2024 आहे.

पदाचे नाव : सफाईगार

भरतीसाठी आवश्यक पात्रता : अर्जदार हा इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा, प्रकृतीने सुदृढ असावा
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क नाही
किती मिळेल पगार?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,000/- ते  47,600/- रुपये पर्यंत पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१

जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा