4 थी उत्तीर्णांना मुंबई उच्च न्यायालयात नोकरीचा गोल्डन चान्स.. तब्बल 47 हजारापर्यंत पगार मिळेल

4 थी उत्तीर्णांना नोकरीचा गोल्डन चान्स आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या ही भरती स्वयंपाकी या पदासाठी होणार आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 27 मार्च 2023 रोजी होणार आहे.

एकूण पदसंख्या – 2 पदे

पदाचे नाव : स्वयंपाकी / Cook

 

शैक्षणिक पात्रता –

1. उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा.

2. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा  

10 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

 

परीक्षा फी – 200/- रुपये

पगार : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये दरमहा आणि इतर भत्ते

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

 

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

मुलाखत तारीख – 27 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001.

भरतीची जाहिरात पहा – PDF