Girna Dam : गिरणाचे 4 दरवाजे उघडले, 5 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

---Advertisement---

 

Girna Dam : जळगाव जिल्ह्यासह गिरणा प्रकल्प व नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे पाण्याची मोठया प्रमाणावर आवक झाली आहे. सद्यस्थितीत गिरणा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडून 4 हजार 884 क्यूसेकचा विसर्ग केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात तीन मोठया प्रकल्पांपैकी गिरणा प्रकल्पात गुरूवारी 96 टक्के पाणीसाठा झाल्याने प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून 814 क्यूसेकचा विसर्ग केला जात होता. गिरणा नदी व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 6 मिलीमीटर पाऊस झाला असून 3.70 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे.

आवकेत होत असलेली वाढ पहाता शुक्रवारी गिरणा प्रकल्पाचे 1, 2, 5 आणि 6 असे चार दरवाजे प्रत्येकी तीस सेंटीमीटरने उघडून 4 हजार 884 क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. गिरणा नदी पाणीपातळीत विसर्गामुळे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.

गिरणावरील प्रकल्प भरण्याच्या मार्गावर

गिरणा प्रकल्पाच्या वर असलेले हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज, ठेंगोडा बंधारा असे प्रकल्प पूर्ण भरले असून चणकापूर 95.55, अर्जूनसागर 89.46 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---