---Advertisement---
उत्तराखंड : उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. खीर गंगा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे अवघ्या ३४ सेकंदात अनेक घरे, हॉटेल्स, होमस्टे आणि अनेक इमारती पत्त्याच्या ढिगाप्रमाणे वाहून गेल्या. आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराच्या पथकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस आणि ढगफुटीमुळे धराली गावात खीर गंगा नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली. व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये ढिगाऱ्यात गाडलेली घरे, वाहणारे रस्ते आणि मदत कार्यात गुंतलेल्या पथके दिसत आहेत. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, अवघ्या ३४ सेकंदात हे सर्व काही घडलं. लोक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहिले, परंतु पुराच्या वेगामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबांचा संपर्क तुटलाअसून, ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरू
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके तात्काळ घटनास्थळी दाखले आणि बचाव कार्य सुरू केले. लष्कराचे हेलिकॉप्टर देखील मदत साहित्य पोहोचवण्यात आणि जखमींना बाहेर काढण्यात मदत करत आहेत. आतापर्यंत ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर बेपत्ता लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रशासनाने लोकांना जास्त उंचीवरील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला आहे. आफ्टरशॉक किंवा अतिरिक्त पुराची शक्यता लक्षात घेता, सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.