T20 World Cup : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात 40 धावांचे समीकरण; टीम इंडियाचं होऊ शकतं नुकसान

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत रोमांचक सामन्यात विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे उपांत्य फेरीची लढत आणखीनच रोमांचक झाली आहे. या निकालाने अफगाणिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर टीम इंडियाला काही टेन्शनही आले आहे कारण त्यांचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. विशेषतः या सामन्यात 40 धावा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे संघ सुपर-8 फेरीच्या गट-1 मध्ये आहेत. टीम इंडिया अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करून 4 गुणाने पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सहज पराभव केला. बांगलादेशवर भारताच्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया जिंकेल आणि त्यानंतर दोन्ही संघ उपांत्य फेरीत स्थान निश्चित करतील अशी अपेक्षा होती. मात्र किंग्सटाउनमध्ये जे घडले ते वेगळे होते आणि त्याने सर्वकाही बदलले.

टीम इंडिया उपांत्य फेरीत कशी पोहोचेल ?
अफगाणिस्तानच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने गट-1 चे सर्वकाही बदलले आहे. टीम इंडिया अजूनही अव्वल स्थानावर आहे आणि मजबूत स्थितीत आहे पण त्यांच्यासमोर आव्हानही आहे. ग्रुप 1 मधून कोणते दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील हे सोमवारी संध्याकाळी ठरवले जाईल, जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा होईल. भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक विजय आवश्यक आहे. त्याचे 6 गुण होतील आणि पहिल्या क्रमांकावर राहून संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला भारताला कोणत्याही किंमतीवर हरवावे लागेल, तरच तो उपांत्य फेरी गाठू शकेल.

पण 40 धावांचे समीकरण 
संपूर्ण युक्ती इथेच आहे आणि इथेच ४० धावांचा आकडा येतो जो टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा  पराभव केला तरी हा विजय मोठ्या फरकाने होऊ नये हे टीम इंडियासाठी महत्त्वाचे आहे. टीम इंडियाला कोणत्याही किंमतीत 40 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने पराभव टाळावा लागेल. अथवा असे झाल्यास ऑस्ट्रेलिया नेट रनरेटच्या बाबतीत टीम इंडियाला मागे सोडेल. केवळ 40 धावाच नाही तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला 31 चेंडूंआधी जिंकण्यापासून रोखावे लागेल कारण असे करूनही ऑस्ट्रेलिया नेट रनरेटमध्ये पुढे असेल.

अन्यथा नुकसान होईल
आता जर अफगाणिस्तानने आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवले आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेही भारताचा एवढ्या मोठ्या फरकाने पराभव केला तरी टीम इंडिया उपांत्य फेरीत नक्कीच पोहोचेल. पण, तरीही पराभवाचा सामना करावा लागेल. यामागचे कारणही आम्ही तुम्हाला सांगतो. खरं तर, टीम इंडिया आपल्या गटात पहिला असो वा दुसरा, कोणत्याही परिस्थितीत त्याला दुसरी उपांत्य फेरी खेळायची आहे, परंतु दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवसाची तरतूद नाही. आता जर दुसरा उपांत्य सामना पावसामुळे वाहून गेला, तर जो संघ त्याच्या गटात पहिला असेल तोच अंतिम फेरीत पोहोचेल. अशा स्थितीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर राहिल्यास अंतिम फेरीला मुकणार आहे. त्यामुळे 40 धावांचा हा आकडा टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे.