जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर-मुक्ताईनगर तालुक्यासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
धरणाखाली भुसावळ, यावल, चोपडा, अंमळनेर, जळगाव,जामनेर, एरंडोल, धरणगाव, या सर्व तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील तासात हातनुर धरणातून चार लाख क्युसेस पाणी प्रवाह सोडण्यात येणार आहे.
तसेच सर्व तहसीलदार व पोलीस विभागास नदीकाठच्या गावी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पोलीस विभागास विभागाकडे असलेल्या बोटी बोटी तसेच पट्टीचे पोहणारे नावाडी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आपला मित्र पथक यांना नदीच्या गावी तत्पर आणि बाबत कळविले आहे.
सतर्कतेचा इशारा
पाण्याचा विसर्ग वाढल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे सर्व दरवाजे पूर्ण उघडल्याने नागरिकांनी नदीपात्रालगत जाऊ नये, गुराढोरांनाही त्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.