---Advertisement---
जळगाव : दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन दगडफेक झाल्याची घटना रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे समोर आली आहे. गावामध्ये तणापुर्ण वातावरण असून घटनास्थळी पोलीस पोचले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून तहसीलदार बंडू कापसे यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला. या वादातून दगडफेक झाली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ, यावल, रावेर या ठिकाणावरून पोलीस कुमक तातडीने ऐनपुर गावी मागवण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सी. व्ही. महेश्वर रेडी यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला भेट दिली आहे व तेथील परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली आहे.