इंग्लंडने पाकिस्तानची इज्जत काढली; रावळपिंडी टेस्टमध्ये झाले ५ वर्ल्ड रेकॉर्ड

नवी दिल्ली : रावळपिंडी येथे इंग्लंड आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने इंग्लंडने ७४ धावांनी शानदार विजय साकारला. या कसोटी सामन्यात एक-दोन नव्हे तर ५ वर्ल्ड रेकॉर्ड झाले. पाकिस्तानच्या मैदानावर जावून त्यांना धूळ चटविणार्‍या इंग्लंडच्या जबरदस्त खेळामुळे ही कसोटी नेहमीच सर्वांच्या लक्षात राहिल.

असे झाले ५ वर्ल्ड रेकॉर्ड

एका दिवसात सर्वाधिक धावा
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्याच दिवशी ५००पेक्षा अधिक धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी कोणत्याही संघाने इतक्या धावा याआधी केल्या नव्हत्या.

एका दिवसात चार शतक
सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने फक्त सर्वाधिक धावांचा विक्रम केला. तर त्यांच्या चार फलंदाजांनी शतक झळकावली. कसोटीत प्रथमच असे झाले की एका संघातील चार खेळाडूंनी शतक केली.

सामन्यात तब्बल १ हजार ७६८ धावा
पाक-इंग्लंड सामन्यात दोन्ही संघांनी मिळून १ हजार ७६८ धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात झालेली ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी २००४ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात १ हजार ७४७ धावा झाल्या आहेत.

हॅरी ब्रूकचे दोन रेकॉर्ड
हॅरी ब्रूकने ११६ चेंडूत १९ चौकार आणि ५ षटकारांसह १५३ धावा केल्या. ब्रूकने फक्त ११५ चेंडूत १५० धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही चौथ्या क्रमांकाची सर्वात १५० धावा ठरल्या. इतक नाही तर त्याने पहिल्या दिवशी एका षटकात ६ चौकार मारले तर दुसर्‍या दिवशी जाहिद अहमूदच्या ओव्हरमध्ये २७ धावा वसूल केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात दोन वेळा २४ पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.