---Advertisement---

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलेच्या पर्समधून ५० हजार लंपास

---Advertisement---

जळगाव : होळीनिमित्त सामान खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास फुले मार्केट परिसरात घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर येथील अरुणा आनंदराव महाडिक (वय ५५) या महिला बुधवारी रोजी होळीनिमित्त सामान खरेदीसाठी जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये आल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पर्समधून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

ही घटना उघडकीला आल्यानंतर महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment